भाषा बदला
×
सामग्री
मराठी – कुमाओनी
शेजाऱ्यांशी संभाषण
  • बर्माजी नमस्कार, आत येऊ का मी? आज घरीच दिसत आहेस, दुकानात नाही गेलास का?
    बर्मा ज्यू नमस्कार, के् भितेर ऐ् सकुं मैं? आज घरै में देखीणौं छा, दुकान निं गया के्?
  • नमस्कार दिवाण, अरे हे काय विचारणे झाले, हे तर तुझेच घर आहे, आपल्याच घरात काय विचारायचे?
    नमस्कार हो दिवान, पुछणौं के् काम भै् यार यमैं, यो् त् तेरै घर भै्, अपंण घर में के् पुछण।
  • अरे नाही मित्रा, शिष्टाचार नावाची काही गोष्ट असते की नाही. मला न विचारता आत यायला आवडत नाही.
    अरे नै् यार, तमीज लै् क् कोई चीज हुं। मकं भल निं लागन बिना पुछि भितेर घुसण।
  • सोड मित्रा शिष्टाचार वगैरे, इथे सोफ्यावर बस. आणखी सांग काय नवीन खबरबात आहे तूझ्याकडे?
    छो्ड़ यार तमीज हमीज, या्ं भैट सोफा में। और सुंणा के् है्रैईं नई ता्जि समाचार त्या्र।
  • अरे आता म्हातारपणात काय नवीन खबरबात असणार, नवीन तर तरुणांचे असतात, आपले तर तेच जुने झाले.
    के् हुनिं यार नई ता्जि अब बुड़्यांकाव में, नई ता्जि त् जवानना्ंक हुंनी, अपंण त् उई पुराणै भै।
  • तुला आताच कुठून म्हातारपण आले मित्रा, अजूनही तू भल्याभल्या तरुणांपेक्षा जास्त काम करतोस.
    का्ं बटि बुढ़ा्प् ऐगो यार तुकं अल्लै बटि, आ्इ त् तु भा्ल भा्ल जवानन है् ज्यादा काम कर छै।
  • म्हणून तर इतक्या दूर चालत दुला भेटायला आलो, तू तर कधी भेटायलाही नाही येत आमच्या बाजूला.
    तबै त् इतु दूर हिट बेर त्या्र पास मिलंण हुं अयुं, तु त् कभ्भै चांण हुं लै् निं ऊंनै हमा्र उथकै।
  • असे नाही मित्रा, खरे तर मध्ये मी घरी गेलो होतो पहाडला, त्यामुळे नाही येऊ शकलो तुझ्याकडे.
    तौ् बात न्हां यार असल में बीच में मै घर जै् रैछ्यूं पहाड़ कूंछै, तब निं ऐ सक्युं त्या्र पास।
  • काय पहाडला कधी गेला होतास? मला तर समजले पण नाही तू गेल्याचे, सांगायचे तरी तू पहाडला जात आहेस म्हणून.
    किलै पहाड़ कब गो्छै? मकं पत्तै निं चल त्या्र जाणौ्ंक। बतूंण त् चैंछि मकं कि पहाड़ जा्ंणयुं।
  • अरे मित्रा, असाच उभ्या उभ्या कार्यक्रम ठरला जाण्याचा, तुला सांगण्याची संधीच नाही मिळाली.
    अरे यार यस्सै है् पड़ौ, खड़ाखड़ी प्रोग्राम बड़ गो् जांणौ्ंक, तुकं बतूंणौ्ंक मौकै निं मिल।
  • मला समजले तुझे म्हणणे. तुला असे वाटले असेल की जर याला पण सोबत घेऊन जावे लागले तर, त्यामुळे राहू द्या.
    मैं समझ गयुं ते्रि बात। त्वील समझ हुनौ्ल कि कैं यकं लै् लिजा्ंण पड़ौ्ल यैक लिजि रूंण दियौ।