भाषा बदला
×
सामग्री
मराठी – कुमाओनी
विवाह भोजन समारंभात
  • नमस्कार पांडेजी, अभिनंदन तुमचे. मला यायला उशीर झाल माफ करा.
    नमस्कार पांडे ज्यु, बधा्इ हो् अपूंकं। देर है्गे यार मकं ऊंण में माफ करिया। 
  • धन्यवाद ठाकूर साहेब, आपण आलात, फार बरे वाटले, आपल्या येण्याने आमची शोभा वाढली.
    धन्यवाद हो् ठाकुर सैप अपुं आछा भौतै भल ला्गौ, अपूंक ऊंणै्ल हमरि शोभा बढ़ गे। 
  • फार छान केले मित्रा, मुलाचा विवाह झाला, घरात सून आली आणखी काय पाहिजे म्हातारपणात?
    भौतै बढ़ि करौ यार च्योलौ्क ब्या् है्गो, घर में ब्वारि ऐ गे और के् चैं बुड़यांकाव। 
  • काय करणार मित्रा. करायचाच होता त्याचाही विवाह. मुलांचा संसार मार्गी लावणे ही आईवडिलांचीच जबाबदारी असते. तेव्हाच पुरुष गृहस्थीच्या जबाबदारीतून मुक्त होतो, मी बोलतो ते बरोबर आहे ना? कसे?
    के् करूं यार, करणैं छि यैक ब्या् लै, मै बूंकि जिमदारी जो् भै् ना्नतिननौ्ंक घर बार जोड़नै्कि। तबै आ्दिम गिरस्ती् कि जिमदारी बटि मुक्त लै हुं, ठीक कूंणंयूं नै। कस? 
  • हो तुमचे बरोबर आहे पांडेजी. माझ्या डोक्यावर तर अजून जबाबदारी आहे.
    हो्य कूंण त् ठीक रौ्छा पांडे ज्यू। मेरि जिम्मेवारी त् आ्ई ठा्ड़ि छ् म्या्र ख्वा्रम। 
  • करून टाक मित्रा, तू पण मुलाचा विवाह निश्चित करून टाक. जितक्या लवकर हे निपटून जाईल तितके चांगले, कर्तव्यातून मोकळा होशील. तू म्हणत असशील तर मीपण पाहू एखादी मुलगी तुझ्या मुलासाठी?
    करौ करौ यार तुमलै च्यो्लक ब्या् कैं ठैरा्औ। जतु जल्दि निपट गे उतु भल, गंग नै लेला तुमलै। तुम कूंछा त् मैंलै देखुं कैं कोई चेलि तुमा्र च्या्ला्क लिजि। 
  • कर्तव्यातून तर नंतर मोकळा होईन, आधी एखादी चांगली मुलगी तर मिळू द्या, माझ्या मुलाला शोभेल अशी.
    गंग त् बाद में नान पैलि क्वे चे्लि त् मिलौ भलिभलि जै च्या्ला्क लैक। 
  • अरे शोध घेतलास तरच मिळेल ना, इकडे-तिकडे सांग, चार लोकांमध्ये विषय काढ.
    अरे जब ढूंन खोज करला तबै त् मिलै्लि, इथकै कौऔ उथकै कौऔ चार आ्दिमन में जिकर करौ। 
  • भाऊ, मी माझ्या बाजूने सगळे काही केले आहे पण भाग्यात असेल तेव्हाच गोष्टी पक्क्या होतात.
    भाई अपण तरबै सब कर रा्खौ पर विधीक विधान जब हो्ल तबै त् बात बणं। 
  • तू सांगितलेस ना, आता मी पण प्रयत्न करेन. चल जरा मुलाला आशीर्वाद दे.
    तुमल कै् हा्लौ त् अब मैंलै कोशिश करूंन। हिटौ जरा च्या्ल कं आशीर्वाद दि दे्ला। 
  • हो हो चल, तुझी सून तर पाहतोच, पाहतो कशी आहे दिसायला वगैरे.
    हो्य हो्य हिटौ तुमरि ब्वारिक दर्शन त् करि लिनूं, कसि छ् धें दे्खणचाण में। 
  • अरे मित्रा, मी बोललो तर म्हणशील फार स्तुती करत आहेस स्वतःच्या सुनेची, तू स्वतःच येऊन बघ.
    अब यार मैं बतूंनौं तुम कौला बड़ि तारीफ करणौ अपणि ब्वारिकि, तुम खुदै हिट बेर देख लियौ। 
  • बेटा, हे ठाकूर साहेब आहेत, समाज कल्याण खात्यात संचालक आहेत. यांना नमस्कार कर, सूनबाई तूपण कर.
    च्या्ला यो् ठाकुर सैप छन, डायरेक्टर छन समाज कल्याण में। पैंला्ग कौ इनुधं। ब्वारि तु लै कौ। 
  • अरे याची काही गरज नाही बेटा. मी तर तुला आशीर्वाद द्यायला आलो आहे, तू तर मुलगा आहेस आमचा.
    अरे तै्कि के जरूरत न्हां बेटा। मैंल जै तुमनकं आशीर्वाद दिंण छ्, तुमऽ ना्ंनै भया हमा्र। 
  • आयुष्यमान भव बेटा, अभिनंदन तुम्हा दोघांचे. तुमचे जीवन यशस्वी होवो आणखी काय म्हणू शकतो मी?
    जी रयै बेटा। बधा्इ हो् तुम द्विनन कं। तुमर जीवन सफल हो्औ और के् कै सकनूं मैं। 
  • घे सूनबाई हा तुझ्या मुखदर्शनाचा शकुन आहे. घे बेटी हा शकुन आहे, याला नाही म्हणत नाहीत.
    ले् ब्वा्रि यो् शगुन छ् त्यो्र मूख देखियौ्क। धर ले चेलि यकं यो् त् शगुन भै, नैं निं करन। 
  • चला थोडे चहा पाणी घेऊ किंवा काही थंड पिऊ. मग आरामात गप्पा मारता येतील.
    हिटौ हो् मुणिं चहापा्णि या के ठंडहंड पे्ला। पै जै हो्लिंन आरामैल बातचीत। 
  • चहा तर मी नाही पित मित्रा, फार गरम होत आहे. काही शीतपेय मागव, ते पिऊ शकतो.
    चहा त् यार मैं निं पिन्यूं, गरम है्रौ भौ्तै। हो्य के् ठंडहंड मंङै ले, उ त् पिई लै् जा्ल। 
  • जरूर जरूर, शीतपेय मागवतो. माझीसुद्धा इच्छा होत आहे शीतपेय पिण्याची. फार गरम होत आहे.
    जरूर जरूर ठंड मंङू। मेर लै् मन है्रौ पिंण हुं, गर्मी भौतै है्रै। 
  • आता निघतो मित्रा, शीतपेयदेखील घेतले. घरीदेखील जायचे आहे अजून. ऑफिसमधून सरळ इकडेच आलो.
    अब हिटूं यार ठंड लै पि है्लौ। घर लै जा्ंण छ् आ्इ। औफिस बै सिद्ध यैं ऐयूं। 
  • असे नाही चालणार, जेवण तयार आहे, खाऊन जा. असे कुठे होते का, खाल्ल्याशिवाय जाते का कोणी?
    तस नि हुंन, खा्ंण तय्यार छ् खै् बेर जा्ला। तस का्ं हुं। बिन खय्यै क्वे जा्ं के? 
  • पांडेजी, मित्रा मी जेवण नाही करू शकत कारण डॉक्टरांनी जड काही खायला मनाई केली आहे.
    पांडे ज्यू यार खा्ंण नि खै् सकन्यूं मैं किलै कि डाक्टरै्ल परहेज बतै रा्खौ गरिष्ट खा्ंणौ्ंक। 
  • अच्छा, मग ठीक आहे, पण मित्रा बरे वाटत नाही, न जेवता जात आहेस.
    अच्छा तब त् के बात नै पर यार भल नि ला्ंगणैं बिन खय्यै जांणौं छा्। 
  • वाईट वाटून घेण्यासारखी काही गोष्ट नाही ही. घरचीच गोष्ट आहे पुन्हा कधी घरी येऊन जेवेन.
    नक मा्ंनणैं के बात न्हां हो्। अपण घरै्कि बात त् भै् फिर खै् ल्यून कभै घर ऐ् बेर। 
  • हो, हे बरोबर बोललास तू. घरी ये एकदा आरामात घरचे जेवण करू, नक्की ये, नमस्कार.
    हां तौ् कै तुमल बात। घर एै्या कदिनै आरामैल घरा्क रवा्ट खा्ला, अया जरूर नमस्कार।