भाषा बदला
×
सामग्री
मराठी – कुमाओनी
चहाच्या दुकानात
  • भाऊसाहेब, चहापाणी आहे का तुमच्याकडे?
    भा्इ सैप चहापा्ंणिं छ् के् तुमा्र या्ं। 
  • हो हो आहे बसा, काय बनवू चहा की कॉफी?
    हो्य हो्य आऔ भैटौ, के् बणूं चहा या कौफी।
  • अरे कॉफी कोण घेतो इथे, ती बड्या लोकांसाठी असते. आम्हा दोघांसाठी तर चहाच करा फक्कड.
    अरे कौफी को् पिणौं,ठुल आ्दिम नै्कि चीज भै यो् त्। हम द्वि जा्ंणिनां लिजि त् चहाई बड़ा्औ,जरा बढ़ि जसि। 
  • काही हरकत नाही, कॉफी नाही तर चहा तरी. काही तरी प्या तर खरे. ग्राहक जे सांगेल ते त्याला देणे हेच आमचे काम आहे. चहा कसा पिणार, टी बॅग वाला की साखर टाकू?
    क्वे बात नै, कौफी नै चहा्ई सही। पियौ त् सही के न के। गाहक जे कौल हमर काम त् उई पेउणौ्ंक भै्। चहा कस पे्ला टपुक वा्लि या चिनि खितुं। 
  • टी बॅग वाला? अरे असे का म्हणता आजकालच्या साखरेच्या जमान्यात. आता तर सगळीकडे साखरेचा चहाच मिळतो.
    टपुकि वा्ली ? तस के् कूंणौंछा आजकला्क चिनि वा्ल जमा्न में। अब त् सबै जा्ग चिनि वालै चहा मिलं। 
  • तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, भाऊसाहेब संपूर्ण उत्तराखंडात एक माझेच दुकान आहे जिथे अजूनही टीबॅगवाला चहा मिळतो. जरा पिऊन तर बघा. लक्षात ठेवा कसा चहा प्यायला होता लोहाघाटमध्ये.
    बात त् तुम सही कूंणौंछा दाज्यू पर पुर उतराखंड में एक मेरिऽ दुकान छ् जा्ं आ्इ जांलै टपुक वा्ल चहा मिलं। जरा पि बेर त् देखौ। याद करला तुम लै कस चहा पेछि लुघाट में। 
  • अच्छा स्तुती तर फार करत आहात स्वतःच्या टीबॅगवाल्या चहाची, तर आणा टीबॅगवाला चहाच पाजा आम्हालाही.
    अच्छा। तारीफ त् बड़ि करणौंछा हो अपंण टपुकि चहाक ता ल्या्औ टपुकि चहा्इ पेवाऔ हमनकं लै। 
  • बसा बसा आरामात. तोपर्यंत काही खायला देऊ का? बटाट्याटे गुटके आहेत, भजी आहेत. चहा तयार होत आहे तोपर्यंत.
    भैटौ भैटौ ऐरामै्ल। के खा्ंणहुं लै द्यूं तब जांलै के ? आलुक गुटुक छन, पकौड़ि छ्। चहा बड़्नौ तब तक। 
  • द्या काही पण, गुटके ताजे असतील तर गुटकेच द्या पण नमकीन टाकून द्या भाऊ आणि भाजलेली मिरचीसुद्धा.
    दि दियौ के लै, गुटुक ता्जि छन त् गुटुकै दि दियौ पर खटै खिति बेर दिया भाई और भुटि खुस्या्णि लै। 
  • हे घ्या बटाट्याचे गुटके आणि स्पेशल भांगेचे नमकीन, खाऊन लक्षात ठेवाल की कुठे बटाट्याचे खाल्ले होते ते.
    यो् लियौ आलु गुटुक और स्पेशल भा्ंङै खटै, खै बेर यादै करला कें आलु गुटुक खाछि। 
  • वा वा भाऊ. तुम्ही तर तोंडाला चव आणलीत आणखी गुटके द्या. खरोखर फार भारी आहेत.
    वा्हवा दादी। तुमलऽ जिबड़ि में स्वादै जगै दे आ्इ दियौ धं गुटुक। भौतै जोरदार हैरै्ई सच्ची में। 
  • म्हणून तर मी म्हणत होतो की काय लक्षात ठेवाल, खोटे बोलत होतो का? आणखी खा जोमाने. चहासुद्धा तयार आहे, देऊ?
    तबै त् कूणैं छ्युं मैं याद करला, झुटि जै के् बलांणैं छ्युं। और खा्औ जम बेर। चहा लै तय्यार छ्, द्यूं ? 
  • हो द्या. जरा एक ग्लास पाणी पण द्या, दुष्ट मिरची लागली.
    हो्य दि दियौ लाऔ। जरा एक गिलास पा्ंणि लै पेवै दियौ धं, खुस्या्णि ला्गि गे बज्यूणि। 
  • कोणती टीबॅग घ्याल तुम्ही? गुळाची, मिश्री की गट्ट्याची?
    टपुक क्यै्कि लगाला ? गड़ै्कि, मिसिरिकि या गट्टैकि। 
  • तुम्ही तर विचित्रच नावे घेत आहात टीबॅगचे. हे गट्टा काय असते आता? आम्ही न कधी खाल्ले न कधी ऐकले. दाखवा तर जरा.
    तुम त् अणकस्सै नाम लिणौ्ंछा टपुकौ्क। तौ गट्ट के् हुं आ्इ। हमलऽ त् नै कभै सुंण न खै्। दिखा्औ धं मुणीं। 
  • मग तुम्ही आज गट्ट्याची टीबॅग लावूनच चहा प्या. चनियाचा चहा फेमस आहे संपूर्ण लोहाघाटमध्ये.
    तबऽ तुम आज गट्टैकि टपुक लगै बेर चहा पियौ। चनियां चहा फेमस छ् पुर लुघाट में। 
  • अच्छा तर चनिदा नाव आहे तुमचे, चला तुमचे नावही कळले. दुसऱ्यांनाही सांगू की चनिदाच्या इथे चहा जरूर पिऊन पाहा.
    अच्छा तो चनि दा भया तुम चलो तुमर नाम लै पत्त ला्ग गो्। कै दुहा्रकं लै बतून कि चनिदा् वां चहा जरूर पिबेर देखिया। 
  • भाऊ चनिदा वा, तुम्ही तर खुश करून टाकले गट्ट्याच्या टीबॅगचा चहा पाजून. मित्रा खरेच आतापर्यंत असा चहा प्यायला नव्हता.
    भ्इ वा्ह चनिदा्। तुमल त् आनंद कर दे यार गट्टैकि टपुक वा्लि चहा पेवै बेर। यार यस चहा वाकई कें नि पि आजा्ंलै।