अरे के् है्रैईं रे् पनुवां त्या्र हालचाल और के् हाल छन आज त्या्र सागपाता्क
नमस्कार बाबूसाहेब, तुमची कृपा आहे सगळी. आज तर तुम्हाला लागणाऱ्या सर्व भाज्या आणल्या आहेत.
नमस्कार बाब सैप, तुमरि किरपा छ् सब। आज त् तुमा्र मतलबौ्क सबै साग लै्रयूं।
चांगले केलेस मित्रा, आज भाज्यापण सर्व हव्या आहेत. मला चिंता वाटत होती की मंडईत जायला लागू नये मला.
भल करौ यार, आज साग लै् सबै चैं। मकं फिकर है्रै छि, कैं मंडी निं जा्ंण पड़ौ मकं।
अच्छा तर तिवारीजींनी सांगितले तुला, तरीच मनकवडा झालास तू. मी पण म्हणतो याला कसे कळले की आज भाज्या हव्या आहेत मला. चल, जे काही केलेस ते फार चांगले केले मित्रा. मला तर टेन्शन आले होते सकाळी सकाळी मंडईत जायला लागेल, टेन्शन दूर झाले. तू समजदार माणूस आहेस, तू लोकांची किती काळजी घेतोस.
अच्छा तो त्याड़ ज्यूल बता तुकं तबै अंतर्यामी बड़ छै् तु। मै्ंलै कूं यकं कसि पत्त ला्गौ कि आज साग चैल मकं। चल जे्लै करौ बड़ भल करौ यार। मैं त् टेंशन में छ्युं कि भो रत्तै रत्तै मंडि जा्ंण पड़ौ्ल, टेंशन दूर है्गे। आदिम समझदार छै तु इतुक ख्याल धर छै् लोगनौ्ंक।
बटाटे रोजच्या भावाने आहेत, आज काही नवीन दर थोडीच आहे. आणखी जे जे हवे असेल ते सर्व सांगा.
आ्लु उई रोजा्कै भौ् छन, आज कोई नई रेट ज् के् छन। और जे् जे् चैं सब बतै दियौ।
लिहून घे टोमॅटो १० किलो, भोपळा ५ किलो, मटार चांगली आहे ना? पाच किलो मटार पण दे. पत्ताकोबी केला जाईल की फ्लॉवर? चल, पत्ताकोबी चांगला दिसत आहे, ५ किलो तो पण दे. बाकी कोथिंबीर मिरची भाज्यांच्या हिशोबाने दे आणि हो, आले तर विसरलोच, अस्सल गोष्ट, अर्धा किलो ते पण दे. अरे हो मित्रा, सॅलडही केले जाईल. मुळा ५ किलो, काकडी ५ किलो, बस झाले.
ले्ख ले। टिमाटर 10 किलो, कद्दू 5 किलो, मटर भा्ल वा्ल छन नै? 5 किलो मटर लै दे। बन्द गो्बि बणैंई जा्औ या फूल गो्बि? चल बन्द गो्बि भलि दे्खिणैं, 5 किलो उलै धर दे। बा्कि हरि धणिं, मर्च सागा्क हिसाबै्ल धर दे और हां अदरक त् भुलि गयुं असली चीज आ्दु किलो उलै धर। हो्य यार सलाद लै्क बड़ौ्ल मुल 5 किला, खिर 5 किलो बस है्गो।
हे घ्या बाबूसाहेब, भाज्या तर सर्व झाल्या तुमच्या. आणखी काही शिल्लक राहिल्या असतील आणखी काही हवे असेल तर ते पण सांगा आणि चिठ्ठीच्या हिशोबात जोडून पण टाका. पिशवी वगैरे काही आणले आहे की मी इथून देऊ?
यो् लियौ बा्ब सैप साग त् सब है्गो तुमर। के बा्कि रै्गो या और लै् के चैं ता उलै बताओ और पर्चा्क हिसाबै्ल मिलै लै् लियौ। बोरी कट्ट लै् रौछा के या मैं द्ंयुं या्ं बटि।
हे सगळे मित्रा तूच तुझ्या जवळच्या एकदोन पिशव्यांमध्ये चांगल्या प्रकारे भरून दे, मी तर विसरलो घरून आणायला, तुला देऊन जाईन परत पण मित्रा टोमॅटो सर्वात वर ठेव. पैसे पण सांग हिशोब करून.
तौ् सब त् यार तुई अपंण पास बटि एक द्वि कट्टन में धर दे भलीकै, मैं त् ल्युंणैं भुल गयुं घर बटि, तुकं दि जूंन वापस लेकिन यार टिमाटर सबन है मलि धरियै। डबल लै् बता जो्ड़ बेर।
पिशव्या तर मी भरून ठेवतो. तुमचे पैसे झाले आहेत ४७५ रुपये पण तुम्ही मला फक्त तीनशे रुपयेच द्या.
कट्ट में त् धरूंनै। डबल त् हैगै्ईं तुमा्र यो् 475 रुपैं पर तुम मकं तीन सौ रुपैं मात्रै दियौ।
काय रे चारशे पंचाहत्तर झाले आणि तीनशे रुपये द्या का म्हणत आहेस, मला समजले नाही.
किलै रे चार सौ पिछत्तर भईं और तीन सौ रुपैं दियौ किलै कूणौं छै, मेरि समझ में निं ऐ।
बाबूसाहेब हे देवाचे काम आहे ना, देव माझा पण आहे म्हणून आता मी नफा कसा घेऊ?
बा्ब सैप भगवानौ्ंक काम छ् नें, भगवान म्या्र लै् क् भै् यैक लिजि मुना्फ कसि लि सकुं ऐल।
तू तर मोठा देवभक्त आहेस रे पनुवा. चांगले करत आहेस, माणसाची जीवनात प्रगती अशीच होते, पण तरीही हे आमचे काम आहे त्यामुळे आता तू हे पैसे घे, पाचशेची नोट आहे.
तु त् बड़ भगत आदिम छै् भगवानौ्ंक रे पनुवां। भल करणौं छै् रे तस्सिकै हुं आ्दिमीक उन्नति जीवन में फिर लै यो् त् हमर काम छ् यैक लिजि ऐल तु यौ् डबल पकड़, पांच सौक नोट छ्।
हे घ्या साहेब दोनशे रुपये घ्या, पनुवा जे बोलला ते बोलला. तरीही तुम्हाला पटत नसेल तर हे दोनशे रुपये माझी छोटीसी भेट समजून देवाला अर्पण करा. आणखी काही वेळी अवेळी हवे असेल तर कोणाला तरी पनुवाच्या दुकानात पाठवा. मी भाजीपाला आणि आणखी काही हवे असेल ते सर्व पाठवेन.
यो् लियौ सैप द्वि सौ रुपैं तुम पकड़ौ, पनुवैल जे कै् दि उ कै् दि। तुमर दिल तब लै् निं मानौ ता यो् द्वि सौ रुपैं मे्रि तरब बटि नांनिं भेंट समझ बेर भगवान क्ं अर्पण कर दिया। और के चैलौ टैम बिटैम, लगै दिया कैकं लै् पनुवै्ंकि दुकान में। भे्जि द्यूंन सागपात और जे लै चैल।
कमी पडले तर तूच आमचा सावकार असशील, तुझ्याकडेच येईन. आणि हो भाज्या खायला तूपण नक्की ये, म्हणजे तुलाा रामायणाचे निमंत्रणही देत आहे. नक्की ये नाही तर हुक्कापाणी बंद.
कम पड़लौ तो तुई त् भयै हमर सौकार, त्या्रै पास ऊंन। और हां साग खा्ंण हुं तु लै ऐयौ जरूर मेर मतलब रामायणौ्क न्यूंत लै् दिणंयूं तुकं, अयै जरूर नतर ह्वा्कपा्ंणि बंद।
नक्की येईन साहेब पण रात्रीच येईन कारण दिवसा काहीही केले तरी वेळ मिळत नाही.
जरूर ऊंन सैप लेकिन ऊंन रातै हूं किलै्कि दिन में टैम निं मिल सकन कसिकै।
अरे ठीक आहे, रात्रीच ये पण नक्की ये. दिवसा दुकान पण सांभाळायचे आहे, हे तर पहिले कर्तव्य आहे. ठीक आहे मग आता मी निघतो. या दोन्ही पिशव्या दे माझ्या हातात, स्कूटरमध्ये ठेवतो.
अरे ठीक भै् रातै हुं अयै लेकिन अयै जरूर। दिन में दुकान लै् देख्ंणिं भै् यो् त् पैल ड्यूटि छ्। ठीक छ् पै् ऐल मैं हिटुं। तौ् द्विनों कट्टन क्ं पकड़ै दे मकं स्कूटर में धर ल्युं।
हे घ्या साहेब, मागे ठेवून चांगल्या बांधल्या आहेत. ठीक आहे, चला मग, नमस्कार.