भाषा बदला
×
सामग्री
मराठी – कुमाओनी
मंदिरामध्ये
  • जय हो परमेश्वर, जय हो गोलज्यू.
    जै हो परमश्वरा, जै हो गो्लज्यु तुमरि। 
  • पंडितजी नमस्कार.
    पंडित ज्यु पैला्ग।
  • आशीर्वाद यजमान. कुठून आलात आपण?
    आशीर्वाद जजमान। का्ं बटि आछा? 
  • पंडितजी आम्ही अल्मोडाहून आलो आहोत.
    पंडित ज्यू हम त् यें अल्मा्ड़ बटि ऐ रयां। 
  • अल्मोडामध्ये कुठे राहता?
    को् जा्ग रूंछा अल्मा्ड़ में? 
  • आम्ही अल्मोडात जाखनदेवी भागात राहतो.
    हम त् जाखनदेवि में रूंनूं अल्मा्ड़ में। 
  • काय करता तिथे?
    के् करछा वा्ं?
  • विद्युत विभागात आहे. किती दिवसांपासून विचार करत होतो यायचा, आज कसाबसा कार्यक्रम जुळून आला.
    बिजली विभाग में छुं। कतु दिनन बटि ऊंणै सोचणौं छ्यां आज बड़ सकौ प्रोग्राम धो धो। 
  • बरे झाले आलात ते, तसेही जेव्हा देवाचा हुकुम असतो तेव्हाच मनुष्य येऊ शकतो.
    भल करौ ऐगोछा, उसिक लै जब ईष्टौ्क हुकुम हूं तबै आ्दिम पुजि सकं। 
  • पंडितजी मग जरा तुम्ही पूजा करून द्याल, काही सामान तर आम्ही घरून घेऊन आलो आहोत. काही कमीजास्त असेल तर तुम्ही सांगा.
    पंडित ज्यू पै् अपुं पुज करै दे्ला, कुछ समान त् हम घरै बै लै् रयां। जे कमीबेसि छ् अपूं बतै दियौ। 
  • हो हो, दाखवा तर सामान मला, काय काय आणले आहे तुम्ही. सामान तर सर्वच आणले आहेत. बाहेरच्या दुकानातून एक घंटी आणि एक नारळसुद्धा घेऊन या. बस मग पूजा सुरू करू. जा घेऊन या तुम्ही सामान.
    हो्य हो्य, दे्खाऔ धं समान मकं, के् के् लै् रौ्छा। समान सबै लै् रौ्छा। एक घांट भै और एक नारियल भै लियाऔ भैर दुकान बटि। बस फिर शुरू कर दिनुं पुज। जाऔ तुम लियाऔ समान। 
  • घ्या पंडितजी, एक घंटी आणि एक नारळही आणला आहे मी. आणखी काही नको ना?
    लियौ पंडित ज्यू एक घांट और एक नारियल भै् लि ऐयूं मैं। और त् के नि चैंन? 
  • नाही नाही, आणखी काही नको. बाकी काही कमीजास्त असेल तर मी इथून पूर्ण करेन. तुम्ही हातपाय धुवून या आता.
    नै् नै् और के नि चैंन। बा्कि जे कमीबेसि हो्लि मैं पुर करि द्यूंन या्ं बटि। तुम हा्तमूंख ध्वे आऔ पै्। 
  • पंडितजी पूजा मात्र चांगल्या पद्धतीने करा. आम्हाला काहीच घाई नाही. आरामात करा.
    पंडित ज्यु पुज मातरै भलीकै करै दिया। हमनकं जल्दी न्हां। आरामैल कराऔ। 
  • ठीक आहे. बसा तुम्ही या बाजूला तुमच्या पत्नीसह. मुलांना या बाजूला बसवा. हातात पाणी घ्या.
    ठीक छ्। भैटौ तुम इतरबै अप्ंणि सेंणी दगा्ड़। ना्नतिनन कं यो् साइड में भैटै दियौ। हा्त में जल लियौ। 
  • संकल्प करा. ओम .................
    संकल्पकरौ| ओम.................| 
  • चला पूजा संपन्न झाली, आता तुम्ही नमस्कार करून तीन वेळा हात जोडून प्रदक्षिणा घाला.
    चलो पुज संपन्न है्गे अब तुम प्रणाम कर बेर तीन बार परिक्रमा कर लियौ हात जो्ड़ बेर। 
  • झाली प्रदक्षिणा पूर्ण. आता चरणामृत घ्या आणि मुलांनाही बोलवा.
    है्गे परिक्रमा पुरि। अब चरणामिर्त लियौ और ना्नतिनन कं लै बुलाऔ। 
  • घ्या यजमान, पूजा संपन्न झाली. या पिशवीमध्ये मी प्रसाद, आशिष ठेवले आहे. ही घंटी आता मंदिरातच कुठे तरी बांधा. जय हो इष्टदेव, यांचे भले करा. कुटुंबामध्ये धनधान्य, सुखशांती कायम राहू दे. तुमच्या कृपेने यांची पूजा संपन्न झाली. जय हो भगवान. जय हो गोलजी.
    लियौ जजमान, पुजपा्ति है्गे संपन्न। यो् थैलिम मैंल परसाद भै् असीक भै् धरि ह्यैलि। तौ् घांट कं अब कल्लैई बा्दि दियौ मंदिर में कें। जै हो ईष्टा इनौ्र भल करिया। परिवार में धनधान्य, सुख शांति बणै रा्ख्या। तुम्रि किरपाल इन्रि पुजपा्ति संपन्न हैगे। जै हो भगवान। जै हो गो्ल ज्यु। 
  • पंडितजी आता तुमच्या कृपेने पूजा तर झाली. ही आमच्याकडून थोडीबहुत जी काही आहे त्या छोट्याशा दक्षिणेचा स्वीकार करा. आता परिस्थिती थोडी तंग आहे. पुन्हा कधी येऊ तेव्हा चांगल्या प्रकारे तुमची सेवा करू. वाईट वाटून घेऊन नका. तुम्हीही आमच्यासारखेच आहात, वेळी-अवेळी काम करून घेणारे.
    पंडित ज्यू अब अपूं किरपाल पुज त् है्गे। यो् हम लोग नैं तरबै ना्निना्नि दक्षिणा स्वीकार करौ थो्ड़ि भौत जतुक लै छ्। एैल जरा हात टाइट चल रौ। फिर जब कभै ऊंन तब तुमरि भलीकै सेवा करि जा्लि। नक जन मा्निया। हमा्र त् जस लै भया अपुंई भया टैम बे टैम काम चलूंणीं। 
  • अरे यजमान जे द्याल ते घेईन. अशी काही चिंता करू नका. पैसाच सर्व काही नसतो, मनुष्याच्या प्रेमापेक्षा मोठे काय आहे. तुम्ही इतक्या विश्वासाने येता माझ्याकडे, असे काही झाले नाही इथे. तुम्ही आमच्यासाठी रोजचेच आहात. बस, तुमचे भले व्हावे. सगळ्यांना देणारा तो परमेश्वरच आहे, आम्हालाही त्यांचाच आधार आहे. आम्ही तर त्याचेच सेवक आहोत.
    अरे जजमान जे् दि देला उ लि ल्यूंन। तस के फिकर नि करौ। डबलै जै के् हुं सब, आ्दिमी प्यार सबन है ठुलि चीज छ्। तुम इतु भ्रोसै्ल ऊंछा म्या्र पास, तस के नि भै या्ं। तुम हमा्र रोजै्का भया। बस तुमर भल हैई चैं। सबन कं दिणि वा्ल यो्ई परमेश्वर छन, इनरै आसौ्र हमनकं लै छ्। हम त इना्र सेवक भयां। 
  • येतो मग आता आम्ही पंडितजी. पुन्हा कधीतरी येऊ दर्शन घ्यायला. आम्ही येतच असतो इथे.
    हिटनुं पै् ऐल पंडित ज्यु। फिर कभणि दर्शन करूंन। हम त् ऊंनैं रूंनूं या्ं। 
  • हो, हो का नाही? पुन्हा या. आशीर्वाद.
    हो्य हो्य किलै नै। आ्या फिर आ्या। आशीर्वाद।