भाषा बदला
×
सामग्री
मराठी – कुमाओनी
डॉक्टरकडे
  • डॉक्टरसाहेब नमस्कार.
    डाक्टर सैप नमस्कार।
  • नमस्कार, काय त्रास होत आहे?
    नमस्कार के् परेशानी छ् ?
  • डॉक्टरसाहेब, तीन दिवस तापाने तब्येत बिघडली आहे. अंगही खूप दुखत आहे, भूक अजिबात लागत नाही, डोकेही दुखते, सर्दीमुळे नाक वाहत आहे. हैराण झालो आहे.
    डाक्टर सैप, तीन दिन बै जरै्ल हालत खराब छ्। आंङ पीड़ भौत ज्यादा है् गे, भूक बिल्कुल न्हां। ख्वा्र पीड़ लै है्रै, सर्दील नाखा धा्र ला्ग रईं। परेशान हैगयूं।
  • ताप मोजला का तुम्ही? आता आधी कंपाउंडरकडून ताप मोजून घ्या, त्यानंतर औषध लिहून देतो.
    बुखार ना्पौ तुमल ? पै्लि कम्पोडर ध्ं बुखार नपै ल्हियौ अल्लै तब दवा्इ लेखुंन।
  • कंपाउंडरसाहेब, जरा माझा ताप मोजा ना.
    कम्पोडर सैप जरा मेर बुखार ना्पि दियौ त्।
  • यावेळी एकशे तीन आहे.
    एक सौ तीन छ् ऐल त्।
  • डॉक्टरसाहेब, यावेळी एकशे तीन आहे.
    डाक्टर सैप एक सौ तीन छ् ऐल |
  • तीन चार दिवस आधी खाण्यापिण्यात काय आहे हेपण मला सांगा, तरच योग्य अंदाज येऊ शकेल.
    खा्ंणपिंण में के् ल्हे तीन चार दिन पैलि तुमल यो् लै मकं बताऔ तबै सही अन्दाज ऐ सकौ्ल।
  • खाणेपिणे तर घरचेच होते साहेब, पण चार दिवसांपूर्वी तहान लागली होती म्हणून मित्रांबरोबर फ्रीजमधील थंड कोकाकोला प्यायलो होतो. बस त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच ताप यायला लागला.
    खा्ंणपिंण त् घरै कै भै् सैप लेकिन चार दिन पै्लि प्यास ला्गि रैछी तो एक फ्रिजै्कि ठंडी कोकाकोला पि दे दोस्ताना्ंक दगै। बस वीकै दुहा्र दिन बै बुखार ऐ्गो।
  • बरोबर सांगितलं तुम्ही डॉक्टर साहेब. हे थंड-बिंड काही पिऊ नये, याचीच करामत आहे सगळी. आता यापुढे मी थंड वस्तूंना हात लावणार नाही. यांनी तर माझी तब्येतच बिघडवली.
    ठीक कौ डाक्टर सैप अपूंल। यो् ठंडफंड के नि पिंण चैंन यैकि करामात छ् सब। अब बटि मैं कभ्भै ठंड चीजनकं ह
  • नमस्कार साहेब, मी निघतो आता. कंपाउंडरसाहेब या चिठ्ठीतील औषधे द्या आणि ती कशी घ्यायची ते पण सांगा.
    नमस्कार सैप, ऐल हिटुं। कम्पोडर सैप यो् पर्चैकि दवा्इ दि दियौ ध्ं, बतै्लै दिया।
  • या दोन-दोन गोळ्या गरम पाण्याबरोबर घ्यायच्या आहेत दिवसातून तीन वेळा. ही एक गोळी सकाळी नाश्ता केल्यानंतर आणि हे एक झाकण पिण्याचे औषध दिवसातून चार वेळी गरम पाण्यामध्ये मिसळून प्या.
    यो् द्वि द्वि गो्इ खा्ंण छन दिन में तीन बार गरम पा्ंणि दगै। यो् एक गो्लि रत्तै नाश्ता करिया बाद और दिन में चार बार यो् पिंणिं दवा्इ एक ढक्कन गरम पा्ंणि में मिलै बेर पि ल्हिया।
  • ठीक आहे, कंपाउंडरसाहेब. किती पैसे झाले?
    ठीक छ् कम्पोडर सैप। डबल कतु है्गैईं ?
  • दाखवण्याची फी शंभर रुपये आणि औषधांचे ऐंशी रुपये. एकशे ऐंशी रुपये द्या.
    सौ् रुपैं देखिया्क और अस्सी रुपैं दवा्इ ना्क। एक सौ अस्सी रुपैं दि दियौ।
  • हे घ्या कंपाउंडरसाहेब, पाचशे रुपये आहेत.
    यो् लियौ कम्पोडर सैप, पांच सौ रुपैं छन।
  • अरे भाऊ सुट्टे पैसे द्या, येथे माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत. सकाळी सकाळी सुट्टे पैसे नसतात.
    अरे भाई टुटि डबल दियौ या्ं टुटि डबल न्हांतन म्या्र पास। रत्तै रत्तै खुलि डबल निंहुन।
  • ठीक आहे, मी बाहेरून सुट्टे करून आणतो, आता देऊन जातो तुम्हाला. माझ्याकडेही सुट्टे पैसे नाहीत.
    ठीक छ्, मैं भैर बटि तुड़वै ल्यूं अल्लै दिजूंल तुमनकं। म्या्र पास लै टुटि न्हांतन।
  • ठीक आहे काही हरकत नाही, सुट्टे करून आणा, हल्ली सुट्ट्या पैशांचा फार त्रास आहे.
    हो्य हो्य के बात नै,तुड़ै ला्औ अज्या्लन भौतै परेशानी छ् टुटि डबल नै्ंकि।
  • हे घ्या कंपाउंडरसाहेब एकशे ऐंशी रुपये, आणले पाचशे रुपये सुट्टे करून. तुमचा आभारी आहे.
    यो् लियौ कम्पोडर सैप एक सौ अस्सी रुपैं, तुड़वै लैयुं पांच सौक नोट। धन्यवाद अपूंकं।