भाषा बदला
×
सामग्री
मराठी – कुमाओनी
बाजारात दुकानदाराशी
  • भाऊ पेरू काय भावाने दिले?
    भाई अमरूद के् भौ दिणौं छा्
  • वीस रुपये किलो आहेत. किती देऊ?
    बीस रुपैं किलो छ्न। कतु दि द्युं ?
  • बरोबर दर लावा. मला दोन किलो हवे आहेत.
    सही सही रेट लगा्औ, द्वि किलो चैंनिं मकं।
  • याहून कमी भावात नाही मिळणार, घ्या किंवा नका घेऊ.
    यहै कम रेट में नि मिला्ल, लियौ या झन लियौ।
  • द्या मग एकच किलो द्या. जरा चांगले चांगले पिकलेले ठेवा.
    ला्औ पै एक्कै किला दियौ, मुणिं भला भा्ल पाकि पाकि जा्स धर दिया।
  • माझ्याकडे पिशवी नाही, कसे नेणार?
    म्या्र पास थैलि न्हां, क्यमें लिजा्ला ?
  • पिशवी आहे माझ्याकडे, यामध्ये टाक.
    थैल छ् म्या्र पास, यमें खित दियौ।
  • मला सुट्टे पैसे द्या, माझ्याकडे द्यायला सुट्टे पैसे नाहीत.
    डबल टुटि दिया मकं, म्या्र पास टुटि न्हांतन दिणा लिजि।
  • चिंता करू नका. माझ्याकडे आहेत सुट्टे पैसे. हे घ्या.
    चिंता नि करौ। म्या्र पास छ्न टुटि डबल, यो् लियौ।
  • भाऊसाहेब, तुमच्याकडे पाचशेचे सुट्टे आहेत का?
    भाई सैप तुमा्र पास पांच सौक टुटि छ्न के्
  • नाही भाऊ, पाचशे सोडा, पाचचे पण सुट्टे नाहीत.
    ना् हो पांच सौ छाड़ि पांचा्क लै न्हांतन।
  • कोण देऊ शकतात येथे, सांगाल का?
    को् दि सकं या्ं, बताला।
  • समोर त्या हलवायाकडे मिळतील कदाचित.
    पार उ हलवाई पास मिल जा्ल शायद।
  • भाऊसाहेब पाचशेच्या नोटेचे सुट्टे द्याल का मला?
    भाइ सैप पांच सौ नाटा्क खुलि दि दे्ला मकं।
  • देईन, पण थोडीफार मिठाई घ्यावी लागेल.
    दि त् द्यूंन पर मिठै लिंण पड़ै्लि थो्ड़ि भौत।
  • ठीक आहे, पण आधी दर सांगा. दोन्हीचे भाव काय आहेत?
    ठीक छ् पर पैलि रेट बताऔ ? के् भौ् छ् द्वीनोंकै ?
  • दर एकच आहे, दोन्हीचे दोनशे रुपये किलो, जे हवे ते घ्या.
    रेट एक्कै छ् द्वि सौ रुपैं किला द्वीनोंक चाहे जो् वा्लि लियौ।
  • भाव थोडा कमी करा. मी दोन्ही अर्धा अर्धा किलो घेईन.
    मुणिं कम करौ दादी। आ्दु आ्दु किलो द्वीनें ल्ह्युंन मैं।
  • दोन्हीचे दोनशे रुपये होतील, देऊ का सांगा.
    द्विनोंऽक द्वि सौ लागा्ल। बताऔ द्यूं ?
  • कशात नेणार? पिशवी आहे का तुमच्याकडे?
    क्यमें लिजा्ला ? झो्ल छ् तुमा्र पास ?
  • प्लॅस्टिकच्या पिशवीत द्या. मी पिशवी तर नाही आणली.
    प्लास्टिका झ्वा्ल में दि दियौ। झ्वा्ल त् मैं निं लै रियूं।
  • प्लॅस्टिकच्या पिशवीवर बंदी आहे. दंड भरावा लागेल.
    प्लास्टिका्क झ्वा्ल में पाबन्दी छ्, जुर्मा्न भरण पड़नौ।
  • मग कसे करणार? काही उपाय सांगा.
    पै् कसि हो्ल दाज्यू ? के उपाय बताऔ ?
  • त्या समोरच्या दुकानात कापडी पिशव्या मिळतात, तिथून एक पिशवी घ्या.
    उ सामणींक दुकान में कपड़ा्क झ्वा्ल मिल्नी। एक लि लियौ।
  • हां, हे ठीक आहे, त्यामध्ये ठेवतो. हे घ्या तुमचे पैसे.
    हां तौ् ठीक छ्, उमें धरि ल्युंन। यो् लियौ अपण डबल।